Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-२३२)
महापुराण
(६१
युष्मन्नामावलीदुब्धविलसत्स्तोत्रमालया। भवन्तं वरिवस्यामः प्रसीदानुगृहाण नः ॥ २२४ इदं स्तोत्रमनुस्मृत्य पूतो भवति भाक्तिकः । यः सम्पाठं पठत्येनं स स्यात्कल्याणभाजनम् ॥ २२५ ततः सदेदं पुण्यार्थी पुमान् पठतु पुण्यधीः । पौरुहूती श्रियं प्राप्तुं परमामभिलाषुकः ॥ २२६ स्तुत्वेति मघवा देवं चराचरजगद्गुरुम् । ततस्तीर्थविहारस्य व्यधात्प्रस्तावनामिमाम् ॥ २२७ इन्द्राने स्तुति करून नन्तर तीर्थविहाराची पुढील प्रस्तावना केली ।। २२७ भगवन्भव्यसस्यानां पापावग्रहशोषिणाम् । धर्मामतप्रसेकेन त्वमेधि शरणं विभो ॥ २२८ भव्यसार्थाधिप प्रोद्ययाध्वजविराजित । धर्मचक्रमिदं सज्जं त्वज्जयोद्योगसाधनम् ॥ २२९ निय मोहपृतनां मुक्तिमार्गोपरोधिनीम् । तवोपदेष्टुं सन्मार्ग कालोऽयं समुपस्थितः ॥ २३० इति प्रबुद्धतत्त्वस्य स्वयम्भर्तुजिगीषतः । पुनरुक्ततरा वाचः प्रादुरासन्शतक्रतोः ॥ २३१ अथ त्रिभुवनक्षोभी तीर्थकृत्पुण्यसारथिः । भव्याब्जानुग्रहं कर्तुंमुत्तस्थे जिनभानुमान् ॥ २३२
हे प्रभो, आपल्या एक हजार आठ गुण पंक्तीनी गुंफलेली व शोभणारी अशा स्तुतिमालेने आम्ही आपली पूजा करतो. हे प्रभो, आपण आम्हावर प्रसन्न व्हा, आम्हावर आपला अनुग्रह करा ॥ २२४ ॥
हे स्तोत्र चांगले स्मरून भक्ति करणारा भव्यजीव पवित्र होतो. या उत्तम स्तोत्रपाठाला जो म्हणतो तो पंचकल्याणाचे पात्र होतो ॥ २२५ ॥
म्हणून इंद्राची लक्ष्मी प्राप्त करून घेण्याची अतिशय अभिलाषा करणारा पुण्यार्थीपुण्ययुक्त बुद्धीचा मानव हे स्तोत्र नेहमी म्हणो, नेहमी या स्तोत्राचे पठन करो ॥ २२६ ।।
याप्रमाणे इन्द्राने चराचरजगाचे गुरु अशा भगवंताची स्तुति करून नन्तर तीर्थविहाराची पुढील प्रस्तावना केली
हे भगवन्ता, पापरूपी अवर्षणाने शुष्क झालेल्या भव्यजीवरूपी धान्याना धर्मामृताची वृष्टि करून आपण वृद्धिंगत करा. हे विभो, आम्ही आपणास शरण आलो आहोत ॥ २२८॥
उभारलेल्या दयारूपी ध्वजाने शोभत असलेल्या भव्यजीवांचा राजा अशा हे जिनेश्वरा, आपणास जगद्विजयाच्या कार्यात साधन असलेले हे धर्मचक्र सज्ज आहे ॥ २२९ ॥
मोक्षमार्गात आड येणाऱ्या मोहाच्या सेनेला जिंकून जगाला सन्मार्ग दाखविण्याची वेळ आता प्राप्त झाली आहे ॥ २३० ।।
ज्यांना जीवादिक तत्त्वांचे ज्ञान झाले आहे व स्वयं विजयाची इच्छा धारण करणाऱ्या भगवंताना हे इंद्राचे भाषण पुनरुक्तिप्रमाणे झाले ।। २३१ ।।
यानन्तर त्रैलोक्यात क्षोभ उत्पन्न करणारे, तीर्थंकरपुण्यकर्मरूपी सारथी ज्यांना प्राप्त झाला आहे असे जिनेश्वररूपी सूर्य भव्यकमलावर अनुग्रह करण्यासाठी उद्युक्त झाले. अर्थात् विहार करण्यासाठी उठून उभे राहिले ॥ २३२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org