________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला.
पान ३१.
मस्तकांची नम्रता करून विनयानें मुनीप्रमाणें कृतिकर्माचे ( आवश्यकक्रियांचं ) सेवन करावे. जीविते मरणे लाभेलाभे योगे विपर्यये । बन्धावरौ सुखे दुःखे सर्वदा समता मम ॥ ६४ ॥ अर्थ- जगणे आणि मरणें, लाभ आणि हानि, संयोग आणि वियोग, बंधु आणि शत्रु, सुख आणि दुःख ह्यांच्याविषयीं माझी सर्वदा समबुद्धि आहे. अशी भावना सामायिकाचे वेळीं करावी. पापिष्ठेन दुरात्मना जडधिया मायाविना लोभिना । रागद्वेषमलीमसेन मनसा दुष्कर्म यन्निर्मितम् ॥ त्रैलोक्याधिपते जिनेन्द्र भवतः श्रीपादमूलेऽधुना । निन्दापूर्वमहं जहामि सततं वर्वर्तिषुः सत्पथे ॥ ६५ ॥
अर्थ- हे त्रैलोक्यनाथा श्रीजिनेंद्रा ! अत्यंत पातकी दुष्ट अज्ञान कपटी लोभी आणि रागद्वेषांच्या योगानें मलिन झालेला असा जो मी, त्या माझ्या हातून मनानें आतांपर्यंत जे पापकर्म झाले असेल; तें । पापकर्म ह्या वेळीं तुझ्या चरणाजवळ त्याची निंदा करून सोडून देतों. मी आतां सर्वदा सन्मार्गानें वागण्याची इच्छा करीत आहे.
षडावश्यकसत्कर्म कुर्याद्विधिवदञ्जसा ॥ तदभावे जपः शुद्धः कर्त्तव्यः स्वात्मशुद्धये ॥ ६६ ॥ अर्थ - श्रावकानें आपल्या शुद्धीकरितां पडावश्यकक्रिया यथाविधि तत्काल कराव्यात. त्या जर
222:
3030025AAAAALANAUB
For Private And Personal Use Only