________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा.
पान ३९२.
ex2NTERNS
आयव्ययं कुलाचारं दत्तं भुक्तं नृपेण यत् ॥ १०४ ॥
अर्थ - राजाची नोकरी पतकरून वैश्याने साऱ्या देशासंबंधाने जे लिहावयाचे असेल तें लिहावें. राजाची प्राप्ति ( वसूल) किती आहे, खर्च किती आहे; राजाचा कुलाचार कसा आहे; राजानें कोणाला काय दिले; तसेंच स्वतःकरितां काय खर्च केलें; ह्या सर्व गोष्टी वैश्यानें लिहाव्यात.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
व्ययं तु सदने स्वस्य वाऽऽदायं वा कतिप्रमम् ॥
द्रविणं कस्य किं दत्तं गृहीतं किं च कस्य वा ।। १०५ ।।
अर्थ — तसेच आपल्या घरांतील खर्च किती झाला, मिळकत किती झाली हैं लिहावें. आणि आपण कोणाला किती द्रव्य दिलें, कोणापासून किती द्रव्य घेतलें हेंही लिहावें.
कति धान्यं कति द्रव्यं सुवर्ण वाऽथ गोधनम् ॥
भुक्तिभाण्डं च संलेख्यं यतो न संशयो भवेत् ॥ १०६ ॥
अर्थ- आपल्या घरांत धान्य किती आहे, द्रव्य किती आहे, सोनें किती आहे, गायी अशी किती आहेत, भोजनाची भांडी किती आहेत, हें सर्व वैश्यानें लिहून ठेवावें. ह्मणजे त्या योगानें संशय उत्पन्न होत नाहीं.
लञ्चं खुचं न गृण्हीयात् कूटलेखं च वर्जयेत् ॥
^a^ANAN
For Private And Personal Use Only