________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७२१.
व्रतार्वागघमेकाहं विवाहात्प्राग्दिनत्रयम् ॥ १०८ ॥ ऊढानां मरणे पित्रोराशौचं पक्षिणी मतम् ॥ ज्ञातीनां वालवो भर्तुः पूर्ण पक्षस्य चोदितम् ॥ १०९ ॥
अर्थ – आतां कन्येविषयीं सांगतात- चौलसंस्कार करण्याच्या पूर्वी जर कन्या मृत झाली तर तिच्या आईबाप वगैरे बंधुगणाने फक्त स्नान करावें. चौलानंतर व्रतबंध होण्याच्या पूर्वी मृत झाली असतां एक दिवस आशौच धरावें. व्रतबंधानंतर विवाह होण्याच्या पूर्वी मृत झाल्यास तीन दिवस आशौच धरावें. कन्येचा विवाह झाल्यावर जर ती मृत होईल तर तिच्या गातापितरांनीं पक्षिणी आशौच धरावें. बंधु वगैरेंनी स्नान करावें. आणि पति व त्याचे भाऊबंद ह्यांनी दहा दिवस पूर्ण आशौच धरावें.
पक्षिणी वगैरेचें लक्षण.
पक्षिणीलक्षणं- द्विदिवा रात्रिरेका च पक्षिणीत्यभिधीयते ॥ अहोरात्रमिति प्रोक्तं नैशिकीत्यभिधीयते ॥ ११० ॥ आसायमहरेव स्यात्सद्यस्तत्काल उच्यते ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
एवं विचार्य निर्णीतमाशौचे तु मनीषिभिः ॥ १११ ॥
अर्थ- आतां पक्षिणीचें लक्षण सांगतात- सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असे दोन दिवस, आणि
VAVAL
For Private And Personal Use Only