________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा, पान ७५१.
अर्थ- वीतराग अशा श्रीजिनांच्या मुखांतून निघालेला हा धर्म जीवदयारूपी दिवसाला उत्पन्न करणारा, मिथ्यात्वरूपी अंधकाराचा नाश करणारा, अनंत जन्मांतील अनंतदुःखसमूहरूपी समुद्राचें शोषण करणारा, भव्यजीवरूपी कमलांना आनंदित करणारा आणि कुगतिरूपी दिवाभीतांचा नाश करणारा असा असल्यामुळे सूर्याप्रमाणे आहे. ह्मणून तो त्रैलोक्यांत पूज्य असलेला धर्म सर्व जनांचे रक्षण करो !
देवेन्द्रवृन्दसुमुखैः परिसेव्यपादो ।
मोक्षस्य सौख्यकथकः परमात्मरूपः ॥ संसारवारिधितयोध्दृत सौख्यभारो ।
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
दद्यात्स वो जिनपतिः शिवसौख्यधाम ॥ २०७ ॥
अर्थ- देवेंद्रांचे समूह ज्यांत मुख्य आहेत अशा भव्यजीवसमूहानें ज्याच्या चरणांची सेवा केली जात आहे, जो स्वतः परमात्मस्वरूप असून मोक्षाचं स्वरूप लोकांना कथन करीत आहे असा आणि संसारसमुद्रांतून सौख्यांचा भार तीरावर उचलून आणणारा ( संसारसमुद्रांत सुख नसून त्याच्या पलीकडे सुख आहे असे सांगणारा ) भगवान् जिनपति तुझांला कल्याण आणि सुख ह्यांचें स्थान देवो.
धर्मप्रभावेण भवन्ति सम्पदो । मोक्षस्य सौख्यानि भवन्ति धर्मतः ॥ जीवन्ति धर्माद्रणमूर्धिन मानवा । स्तस्मात्सदा साधय धर्मसाधनम् ॥ २०८ ॥
For Private And Personal Use Only