________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७४९.
Newomen
भावना चानुप्रेक्षाणां तथात्मप्रतिभावना ॥ २०२॥ पात्रदानं यथाशक्ति चैकभक्तमगृद्धितः॥ ताम्बूलवर्जनं चैव सर्वमेतद्विधीयते ॥ २०३ ॥ यदिने वर्तते श्राद्धं तहिने तर्पणं जपः॥
पूर्वोक्तविधिना सर्व कार्य मनादिसंयुतम् ।। २०४॥ अर्थ- जर वैधव्यदीक्षा ग्रहण केली तर त्या स्त्रीने पुढीलप्रमाणे वागावें. तिने देशविरतिव्रत ग्रहण करावें. मंगलसूत्र, कानांतील अलंकार, आणि बाकीचे दागिने ह्यांचा त्याग करावा. एक वस्त्राचा तुकडा नेसावा. अंगावर घ्यावयाच्या दुसऱ्या वस्त्राने मस्तकावर आच्छादन करावें. पलंगावर शयन करणे, डोळ्यांत काजळ घालणे, अंगाला हळद लावून स्नान करणे ह्यांचा त्याग करावा. पतीबद्दल शोक करून रडूं नये. वाईट गोष्टी बोलूं नयेत. प्रत्येक दिवशी प्रातःकालीं स्नान करून नुसते (मंत्र न ह्मणतां ) आच-, मन करून प्राणायाम, तर्पण, अर्घ्यप्रदान ह्या क्रिया कराव्यात. त्रिकाल जिनस्तोत्र मणावें, शास्त्र श्रवण आणि त्याचे चिंतन करावें. द्वादशानुप्रेक्षांची भावना करावी, व आत्मभावना करावी. आपल्या शक्तीप्रमाणे सत्पात्राला दान करावें, एकवेळ भोजन करावे, तेही फार खाऊ नये, तांबूल भक्षण करूं नये.
For Private And Personal Use Only