Book Title: Traivarnikachar
Author(s): Somsen
Publisher: Rajubai Bhratar Virchand

View full book text
Previous | Next

Page 792
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७४२. वस्त्र वगेरे वस्तु शुध्द करून सर्वांनी स्नान करून व प्रेत दहन करणान्यास स्नान घालून त्याला आपल्या ? घरी भोजन घालावे. ह्याप्रमाणे दहा दिवसपर्यंत वरील सर्व क्रिया करावी. ह्या दहा दिवसांत उत्तरकर्म, करणाऱ्याने प्रतिदिवशी पिंड आणि तिलोदक यांचे दान मृताच्या उद्देशाने करावें. पिण्डप्रदानतः पूर्वमन्ते च स्नानमिष्यते ॥ पिण्डः कपित्थमात्रश्च स च शाल्यन्धसा कृतः ।। १७६ ॥ तत्पाकश्च बहिः कार्यस्तत्पात्रं च शिलाऽपि च ॥ कर्तुः संव्यानकं चापि पहिः स्थाप्यानि गोपिते ॥ १७७ ॥ अर्थ-पिंडदान करण्याच्या पूर्वी आणि पिंडदान केल्यानंतर असे दोन वेळ कर्त्याने स्नान करावें. पिंड तांदुळ शिजवून त्याच्या भाताचा कवठा एवढा मोठा करावा. पिंडाकरितां जे तांदुळ शिजवावयाचे ते घरांत शिजवू नयेत, बाहेर शिजवावेत, आणि भाताचे भांडे, शिला आणि पिंडदान करतांना असलेली नेसावयाचे, व पांघरावयाचे अशी दोन वस्त्रे बाहेरच कोठेतरी गुप्त ठिकाणी ठेवावीत; घरांत आणू नयेत. पिंडदानादि कर्त्याचे वर्ण्य आचार किंवा प्रेतदीक्षा. कर्तुः प्रेतादिपर्यन्तं न देवादिगृहाश्रमः॥ नाधीत्यध्यापनादीनि न ताम्बूलं न चन्दनम् ॥ १७८ ।। For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 790 791 792 793 794 795 796 797 798 799 800 801 802 803 804 805 806 807 808