________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७४३. ennenungan Nannoncascanner nenocaran
न खट्वाशयनं चापि न सदस्युपवेशनम् ।। न क्षौरं न द्विभुक्तिश्च न क्षीरघृतसेवनम् ॥ १७९ ॥ न देशान्तरयानं च नोत्सवागारभोजनम् ॥ न योषासेवनं चापि नाभ्यङ्गस्नानमेव च ।। १८०।। न मृष्टभक्ष्यसेवा च नाक्षादिक्रीडनं तथा ॥
नोष्णीषधारणं चैषां प्रेतदीक्षा भवेदिह ॥ १८१॥ __ अर्थ-- मृताची उत्तरक्रिया करणाऱ्याने ती क्रिया समाप्त होईपर्यंत देवपूजा वगैरे गृहस्थाश्रमाच्या क्रिया करूं नयेत. अध्ययन अध्यापन करूं नये. तांबूल भक्षण, चंदन धारण करू नये. पलंगावर शयन करूं नये. सभेत बसूं नये. क्षौर करूं नये. दोन वेळ भोजन, दूध, तूप ह्यांचे सेवन करूं नये. स्त्रीसमागम करूं नये. तेल लाऊन स्नान करूं नये. देशांतरी गमन करूं नये. ज्याच्या घरांत उत्सव, असेल तेथे भोजन करूं नये. गोड अन्न भक्षण करूं नये. फासें सोंगट्या वगैरेनी खेळू नये. डोकीला, पागोटें बगैरे घालू नये. ह्याप्रमाणे ही प्रेतदीक्षा समजावी.
यावन्न क्रियते शेषक्रिया तावदिदं व्रतम् ।। आचार्यकर्तुरेकस्य ज्ञातीनां बादशाहतः॥१८२॥ (१)
For Private And Personal Use Only