________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७२५.
नपुंसक, पजावे. जाधव.रण्याविण
पतितस्य च दुष्टस्य भस्मान्तं सूतकं भवेत् ।।
यदि दग्धं शरीरं चेत्सूतकं तु दिनत्रयम् ॥ १२१ ॥ __ अर्थ- महाव्याधीने ग्रासलेला, कृपण, ऋणाने गांजलेला, क्रियाहीन , मूर्ख, स्त्रीच्या इच्छेप्रमाणे ६ वागणारा, व्यसनांत गढलेला, नेहमी दुसऱ्याच्या ताब्यांत वागणारा, मातापितरांची श्रादें न करणारा, यतीला अन्नदान न करणारा, नपुंसक, पाखंडी, भ्रष्ट झालेला आणि दुष्ट असलेला अशा लोकांचे आशौच त्यांच्या शरीराची रक्षा होईपर्यंतच समजावें. जर कदाचित् आपल्याला समजण्याच्या पूर्वीच त्याच्या देहाचे दहन झालेले असेल तर तीन दिवस आशौच धरावें.
व्रत करणारे वगैरेंनी आशौच न धरण्याविषयी. व्रतिनां दीक्षितानां च याज्ञिकब्रह्मचारिणाम् ॥
नैवाशौचं भवेत्तेषां पितुश्च मरणं विना ॥ १२२ ॥ अर्थ-व्रत करणारे, दीक्षा घेतलेले, यज्ञ करणारे आणि ब्रह्मचारी ह्यांना कोणाचें आशौच धरावें लागत नाही. फक्त पिता मृत झाला असतां मात्र ह्यांनी आशौच धरले पाहिजे.
श्रोत्रियादिकांचे आशौच. श्रोत्रियाचार्यशिष्यर्षिशास्त्राध्यायाश्च वै गुरुः ॥
PANA
For Private And Personal Use Only