________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
EASE
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७३८. eeeaasaanavaaneerveerenvironmener
श्वशुराचार्ययोरेषां पत्नीनां च पितृष्वसुः ॥ १६१ ॥ मातृष्वसुर्भगिन्याश्च ज्येष्ठाया मरणे सति ॥ दृष्टे तदानीं वपनं श्रुते प्रामासतो भवेत् ॥ १६२ ॥ मातरं पितरं ज्येष्ठमाचार्य श्वशुरं विना ॥
न कार्य वपनं कन्यामृतौ गर्भवतीं तदा (?)॥ १६३ ॥ 4 अर्थ-नंतर त्या प्रेताचे मस्तक दहन झाल्यावर कर्ता (पुत्र वगैरे मृताच्या अंत्यकर्माचा अधिकारी) किंवा दहन करणारा आणि मृताचा बंधुवर्ग ह्यांपैकी ज्यांना अधिकार असेल त्यांनी यथाशास्त्र वपन, (क्षौर) करावें. आईबाप मृत झाले असतां पुत्राने वपन करावे. मातुल, ज्येष्ठभ्राता, श्वशुर, आचार्य आणि ह्यांच्या खिया, आईची बहीण, बापाची बहीण आणि आपली वडील बहीण ह्यांपैकी कोणीही मृत्यु पावले असतां वपन करावें. आईबाप किंवा आपल्यापेक्षां वडील असे कोणी मृत झाल्यास व आचार्य, श्वशुर हे मृत झाल्यास वपन करावे. हा वपनविधि मृताच्या मरणकाली पुत्रादिक तेथे असल्यास त्यांनी तत्काल करावा. आणि ते जर देशांतरी असतील तर त्यांनी मृताला एक महिना होण्याच्या आंत मरण कळल्यास करा. नाहीतर करू नये. कन्या मृत झाली असतां वपन करूं नये.2
___वपनानंतर स्नानविधि.
For Private And Personal Use Only