________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९५.
यदि समं तयोर्गोत्रं तदा शुद्धिस्तु पूर्ववत् ॥ २७॥ __ अर्थ-नीच जातीची जी स्त्री असेल तिची शुद्धता पूर्वी सांगितलेल्या प्रकाराने होते, आणि जर दोघा. ऋतुमतीचे एकच कुल असेल तर त्या दोघांचीही शुद्धिं पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त केल्याने होते.
सूतकं प्रेतकं वाऽघमन्त्यस्पर्शनमेव वा ॥
मध्ये रजसि जातं चेत्स्नात्वा भुञ्जीत पुष्पिणी ॥ २८॥ ___ अर्थ- स्त्री रजस्वला असतांना मध्ये जननाशौच किंवा मृताशौच प्राप्त झाले असता किंवा अंत्यजादिकांचा स्पर्श झाला असतां रजस्वलेने तत्काल स्नान करून भोजन करावे.
आर्तवं भुक्तिकाले चेदन्नं त्यक्त्वाऽस्यगं च तत् ॥ लात्वा भुञ्जीत शङ्का चेत्परं लानेन शुध्द्यति ॥ २९ ॥ मध्ये स्नानं तु कार्य चेत्तद्भवेदुध्दृतैर्जलैः॥
नावगाहनमतस्यास्तडागादी जले तदा ॥ ३०॥ __ अर्थ- भोजन करीत असतां जर स्त्री रजस्वला होईल तर तिने तोंडांतील घास टाकून स्नान करून, भोजन करावे, आणि उगीच शंका आली असें असल्यासही स्नानानेंच शुद्ध होते. तात्पर्य, भोजन करीत आसतां ऋतूची शंका आली असतांही स्नान केलेच पाहिजे. हे जे स्त्रियांनी मध्येच स्नान करावयाचे असते,
ONO.30PAJU
For Private And Personal Use Only