________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९६. maseeBABAVANAVAMMARVADwrveedevoedia इतें जलाशयांतून पाणी वर काढून घेऊन त्याने करावें. जलाशयांत शिरून त्यांत बुडी मारूं नये,
आशौचांत प्रथमऋतुदर्शन झाल्यास. सूतके प्रेतकाशौचे पुष्पं चेत् सिञ्चयेज्जलम् ॥
शिरस्यमृतमत्रेण पूतं द्विजकरच्युतम् ॥ ३१ ।। अर्थ-जननाशौच आणि मृताशौच असतांना जर स्त्री ऋतुमती (प्रथमऋतुमती) होईल तर अमृतमंत्राने ब्राह्मणाकडून तिच्या मस्तकावर उदक सेंचन करावें. कारण ब्राह्मणाच्या हातून पडलेलें उदक शुद्ध असल्याने र ती शुद्ध होते. ह्याचे तात्पर्य- ती स्त्री त्या आशौचांतून मुक्त होते असे नसून फक्त आशौचामध्ये प्रथम ऋतुमती झाल्याचा जो तिचा दोष असतो तेवढा जातो. बाकीचे पूर्वी प्राप्त झालेले आशौच तिला आहेच.
कुर्यादानं च पात्राय मध्यमाय यथोचितम् ॥
कुर्यादेकत्र भुक्त्यादि पुष्पिणी तत्र तत्र च ॥ ३२॥ अर्थ- वरील विधि करून मध्यमपात्राला योग्य असें दान करावें; आणि त्या ऋतुमतीने आपला भोजनादि व्यवहार एकाच ठिकाणी करावा. ह्मणजे ऋतुमतीने जसें वागण्यास पूर्वी सांगितले आहे " त्याप्रमाणे वागावे.
ऋतुमतीने अज्ञानाने को स्पर्श केल्यास.
Reatavaverseasee
For Private And Personal Use Only