________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७१८.
MiViv
320
॥ ९९ ॥ मृद्भस्मकुशगन्धोदैः पंचगव्यैः सुमन्त्रितैः ॥ स्नापायत्वा पिधायान्यद्वस्त्रं तच्चाथ तां दहेत् ॥ १०० ॥
अर्थ- आतां गृहस्थांची आशौचापासून शुद्धि क्रमाने सांगतो. त्यांत गर्भिणी स्त्री मृत झाली असतां लोक कसे करतात ? हें सांगतो. गर्भिणी स्त्री जर सहा महिने होण्याच्या पूर्वी मरण पावली तर तिला स्मशानांत नेऊन त्या गर्भाशीं सहवर्तमान तिचें दहन करावं. गर्भच्छेद करूं नये. आणि सहा महिन्यापेक्षा । अधिक दिवस झाले असतील तर तिला स्मशानांत नेवून तिचा पति, पुत्र, किंवा ज्येष्ठभ्राता ह्यांपैकीं कोणीही तिचे उदर नाभीच्या खाली डाव्या बाजूला कापावें आणि आंतील मूल बाहेर काढावे मग पुण्याहवाचनाच्या मंत्रांनी त्या बालकासह तिला सेचन करावे. वालक जीवंत असल्यास तो पोषणाकरितां कोणाच्यातरी स्वाधीन करावा. उदराच्या छेदांत दही आणि तूप भरून तो छेद बुजवून टाकावा. अभिमंत्रण केलेल्या मृत्तिका, भस्म, दर्भ, चंदन ह्यांनी मिश्रित अशा उदकानें व पंचगव्याने तिला स्नान घालून, दुसन्या वस्त्रानें तिला आच्छादन करून तिचें यथाविधि दद्दन करावे.
मग
पतीच्या दशाहाशौचांत पत्नी प्रसूत झाल्यास.
मृते पत्यौ दशाहे स्त्री सूयते च रजस्वला ॥
भूत्वा शुद्धा यथाकालं स्नात्वा चाभरणं त्यजेत् ॥ १०१ ॥
133 পওতব তবaa 232
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only