________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा.
पान ७१६.
news
अर्थ - रजस्वला स्त्री मृत झाली असतां तिला पंचगव्यानें स्नान घालून दुसरें वस्त्र नेसवून विधिपूर्वक दहन करावें. । बाळंतीण मृत झाली असतां.
सूतिकायां मृतायां तु कथं कुर्वन्ति याज्ञिकाः ॥ कुम्भे सलिलमादाय पंचगव्यं तथैव च ॥ ९० ॥ पुण्याहवाचनैर्मन्त्रैः सिक्त्वा शुद्धिं लभेत्तु सा ॥ तेनापि स्नापयित्वा तु दाहं कुर्याद्यथाविधि ॥ ९१ ॥
अर्थ — प्रसूत झालेली स्त्री दहा दिवसांच्या आंत मृत झाली असतां कसे करतात? ह्याचें उत्तर असें कीं, अभिमंत्रण केलेल्या कलशांतील उदक आणि पंचगव्य ह्यांच्या योगानें पुण्याहवाचनाच्या मंत्रांनी तिला सेंचन करून, कलशोदकानें स्नान घालावें, ह्मणजे ती शुध्द होते. मग तिचा यथाविधि दाह करावा. दुसरें मत दशाहाभ्यन्तरे चैव म्रियते चेत्प्रसूतिका ॥
कथं तस्या भवेच्छुद्धिर्दाहकर्म कथं भवेत् ॥ ९२ ॥ शूर्पेण स्नापयेद्नेही दशवारं ततो जलैः ॥ पञ्चपल्लवसंकल्पैः पञ्चगव्यैः कुशोदकैः ॥ ९३ ॥
For Private And Personal Use Only