________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Master
Sevenomen
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७११.।
भार्या कुर्याद, पूर्ण पत्न्या अपि पतिस्तथा ॥ ७३ ॥ है.... अर्थ---पत्नी मृत झाल्याने पतीला माप्त होणारे आशौच आणि पति मृत झाल्याने पत्नीला प्राप्त होणारें।
आशौच ही दोन्ही वरीलप्रमाणेच समजावीत. दूर देशी असलेल्या पत्नीने जर पतीचें मरण दहा दिवसांचे १ पुढे ऐकिलें तर तिने ऐकिल्या दिवसापासून दहा दिवस आशौच धरावें. पत्नीचें आशौचही पतीने ह्या-१ प्रमाणेच धरावें. असें मुनींनी सांगितले आहे.
मातापित्रोर्यथाऽऽशौचं दशाहं क्रियते सुतैः।।
अनेकेऽन्देऽपि दम्पत्योस्तथैव स्यात्परस्परम् ॥ ७४ ॥ 8 अर्थ- पुत्र मातापित्यांचे आशौच वत्सरांतरीही जसें दहा दिवस धरतात, त्याप्रमाणेच पति आणि पत्नी ह्यांनीही एकमेकांचे आशौच केव्हाही दहा दिवस धरले पाहिजे.
पित्याच्या दशाहाशौचांत माता मृत झाल्यास. पितुर्दशाहमध्ये चेन्माता यदि मृता तदा
दहेन्मन्त्राग्निना प्रेतं न कुर्यादुदकक्रियाम् ॥ ७५ ॥ 2 अर्थ-पित्याच्या दशाह आशौचामध्ये जर माता मृत झाली तर तिच्या प्रेताच्या मंत्राग्नीने दाह करावा.?
आणि पुढील क्रिया करूं नये.
Verse
For Private And Personal Use Only