________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४५८.
गृहे पद्मासनस्थाने सुमुहूर्ते निवेशयेत् ॥ १३३ ॥ पूर्वमुखे विधायास्यमधास्थं वामपादकम् ॥ उपरि दक्षिणाशिः स्यादुपर्यस्य करद्वयम् ।। १३४॥ नीराजनं ततः कुर्या
द्विप्रैराशीर्वचः परम् ।। तद्दिने सज्जनान् सर्वान् भोजयेत्प्रीतिपूर्वकम् ॥ १३५॥ ___ॐ हीं अहं असि आ उ सा बालकमुपवेशयामि स्वाहा ॥ इत्युपवेशनम् ।।
अर्थ- आतां उपवेशन विधि (मुलाला बसविण्याची क्रिया) सांगतात- पांचव्या महिन्यांत मुलाचा उपवेशनविधि करावा. त्या वेळी श्रीजिनेंद्राची पूजा करून भूमीची आणि पांच मुलांची पूजा करावी. भात ४ गहूं, उडीद, मूग, तीळ आणि जव यांची रांगोळी घालून एक वस्त्र पसरावें. घरांत मुलाला स्नान घालून अलंकारांनी सुशोभित करून सुमुहूर्तावर त्या वस्त्रावरील पद्मासनावर बसवावें. बसवितांना त्या मुलाचे तोंड पूर्वेकडे करावे. आणि त्याचा डावा पाय खाली व उजवा पाय वर ठेवून त्यावर दोनी हात ठेवून त्याला बसवावें. मग त्या मुलाला आरती ओवाळून ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्यावेत. त्या दिवशी सर्व, सत्पुरुषांना आनंदानें भोजन घालावे. मुलाला बसविण्याच्या प्रसंगी “ॐ हीं अई" इत्यादि मंत्र ह्मणावा. हा उपवेशनाचा विधि सांगितला.
अन्नप्राशनविधि. तथा च ससमे मासे शुभः शुभवासरे ॥
RamaABAUMBAIRAMvoes
NAVINONVEvereB0
For Private And Personal Use Only