________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५३८.
22:
" नांवाचें जें शास्त्र तोच कोणीएक दीप ) श्रुतज्ञानरूप प्रकाश पसरतो. ( सम्यग्ज्ञान असले ह्मणजे, द्रव्या" नुयोगशास्त्रांत प्रतिपादन केलेली जीवादितत्वें समजतात ). तात्पर्य, सम्यग्ज्ञानाने प्रथमानुयोग, करणानुयोग, चरणानुयोग णाणि द्रव्यानुयोग ह्या चारही प्रकारच्या शास्त्रांचं ज्ञान होतें. आणि जर सम्यग्ज्ञान नसेल तर तें शास्त्रज्ञान होत नाहीं. हें सम्यग्ज्ञानाचें वर्णन झालें. आतां सम्यक्चारित्राचें वर्णन करितात - सम्यक्चारित्र.
अथ चारित्रम् - हिंसावृतचौर्येभ्यो मैथुनसेवापरिग्रहाभ्यां च ॥ पापप्रणालिकाभ्यो विरतिः सञ्ज्ञस्य चारित्रम् ॥ ६४ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ -- हिंसा, खोदें भाषण, चोरी, स्त्रीसेवन आणि परिग्रह हीं जीं पातकाला जीवप्रदेशांत सहज प्रवेश करतां येण्याची साधनें त्यांपासून निवृत्त होणें हें सम्यग्ज्ञानी मनुष्याचें चारित्र होत.
चारित्राचे दोन विभाग.
सकलं विकलं चरणं तत्सकलं सर्वसङ्गविरतानाम् ॥
अनगाराणां विकलं सागाराणां ससङ्गानाम् ।। ६५ ।।
अर्थ- तें चारित्र सकल [ संपूर्ण ] आणि विकल [ असंपूर्ण ) असे दोन प्रकारचें आहे. त्यांत
For Private And Personal Use Only