________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा
~~~NN
पान ९४९.
अर्थ - ऊर्ध्वभागांत पूर्वी केलेल्या मर्यादेचे उल्लंघन करणें, खालच्या भागांत मर्यादेचे उल्लंघन करणे, बाजूच्या मर्यादेचें उल्लंघन करणे, पूर्वी ठरविलेल्या क्षेत्रापेक्षां अधिक क्षेत्र वाढविणें आणि पूर्वी केलेली मर्यादा विसरणें हे पांच दिग्विरतिव्रताचे अतीचार आहेत.
अनर्थदंडवताचे स्वरूप.
अभ्यन्तरं दिगवधेरपार्थकेभ्यः सपापयोगेभ्यः ॥ विरमणमनर्थदण्डवतं विदुर्व्रतधराग्रण्यः ॥ ९२ ॥
अर्थ- आपण जी देशमर्यादा केली असेल त्या मर्यादेत कारणावांचून घडणारीं जीं पातकें, त्यांपासून निवृत्त होणें, ह्यांस व्रती पुरुष अनर्थदंडविरतिव्रत समजतात. अनर्थदंडवताचे अतीचार.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पापोपदेशहिंसादा नापध्यानदुःश्रुतीः पञ्च ॥
प्राहुः प्रमादचर्यामनर्थदण्डानदण्डधराः ९३ ॥
अर्थ — दंडाला ( अशुभमन, अशुभवचन अशुभकाय ह्यांना ) न धारण करणारे जे गणधर ते पापोपदेश हिंसादान, अपध्यान, दु:श्रुति आणि प्रमादचर्या असे पांच प्रकारचे अनर्थदंड आहेत असे म्हणताम. किंवा ह्या पांचांसही अनर्थदंड असें ह्मणतात.
For Private And Personal Use Only