________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
अर्थ
पान ६०८.
venererere
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा.
Desen
त्रिरात्रमशुचिस्त्वेषा चतुर्थेऽहनि शुध्यति ॥ १०८ ॥ पूजां न होमं कुर्वीत प्रायश्चित्तं विधीयते ॥
जिनं सम्पूजयेद्भक्त्या पुनर्होमो विधीयते ॥ १०९ ॥ इति प्रसंगाछेदिकादिलक्षणम् ॥ अर्थ — विवाह दिवसापासून चार दिवसांत जर वधू रजस्वला होईल, तर ती तीन दिवस अशुद्ध असते, व चवथ्या दिवशीं शुद्ध होते, ह्मणून पूजा होमादिक विधि करूं नये. ती कन्या शुद्ध झाल्यावर प्रायश्चित्त केलें पाहिजे. त्याकरितां भक्तीनें जिनपूजा प्रथम करून मग विवाहहोम पुनः करावा असें दुसरें एक मत आहे. उभयोः पार्श्वयोः काण्डसंयुक्तं पुञ्जपञ्चकम् ॥ शाल्यादिपञ्चधान्यानां यावारकस्य सन्निधौ ॥ ११० ॥
बहुल्याच्या दोनी बाजूस कांडाशीं सहवर्तमान भात वगैरे पांच धान्यांचे पाच ढीग घालावेत. पूर्वोक्तराश्योर्मध्ये च तथोपरि सुवस्तुकम् ॥
पटं प्रसार्य ते तत्र चानयेद्वरकन्यके ॥ १११ ॥
अर्थ — नंतर पूर्वी सांगितलेल्या ज्या तांदळांच्या दोन राशि, त्यांच्या मध्यभागी चांगलें वस्त्र उभें पसरून ( अंतःपट धरून) त्या ठिकाणीं त्या वधूवरांना आणावें.
अंतःपट धरल्यावर वधूवरांनी उभे रहाणें वगैरे.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only