________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६८८.
Ne
22
प्राकृतं जायते स्त्रीणां मासे मासे स्वभावतः ॥ अकाले द्रव्यरोगाद्युद्रेकात्तु विकृतं मतम् ॥ ६ ॥
अर्थ — रज, पुष्प आणि ऋतु हीं तीन स्त्रियांच्या विटाळाचीं नांवें लोकप्रसिद्ध आहेत. हा स्त्रियांचा ऋतु स्वाभाविक आणि विकृत ( शरीरप्रकृतीत बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा ) असा दोन प्रकारचा आहे. त्यांत महिन्यामहिन्यास स्वाभाविकपणें उत्पन्न होणारा ऋतु प्राकृत किंवा स्वाभाविक समजावा. आणि ऋतुकालीं स्त्रियांच्या शरीरांतून जाणारें द्रव्य किंवा रोग ह्यांच्या आधिक्यामुळे उत्पन्न जो ऋतु तो विकृत समजावा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अकाली ऋतुस्राव.
अकाले यदि चेत् स्त्रीणां तद्रजो नैव दुष्यति ॥ पञ्चाशद्वर्षादूर्ध्व तु अकाल इति भाषितः ॥ ७ ॥
अर्थ - अकालीं जर स्त्रीला रजोदर्शन होईल तर त्यांत कांहीं दोष (आशौच ) नाहीं. पन्नास वर्षांच्या पुढे स्त्रियांचा अकाल समजावा; असें मुनींनी सांगितलें आहे.
आशौच धरण्याचा प्रकार. रजसो दर्शनात्स्त्रीणामाशौचं दिवसत्रयम् ॥
For Private And Personal Use Only