________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ANANAVANAVANAVAVIvedeoes
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ६९२. CentemaenewAVASAWASceroeneweaver
देवं गुरुं नृपं स्वस्य रूपं च दर्पणेऽपि वा ॥ न च पश्येत्कुदेवं च नैव भाषेत तैः समम् ॥ १९ ॥ वृक्षमूले स्वपेनैव खट्वाशय्यासने दिने । मनपञ्चनमस्कारं जिनस्मृति स्मरेध्दृदि ॥ २०॥ अञ्जलावश्नीयात्पर्णपात्रे ताने च पैत्तले ॥
भुक्तं चेत्कांस्यजे पात्रे तत्तु शुध्द्यति वन्हिना ॥ २१ ॥ ६ अर्थ- योग्यकाली ऋतुमती झालेल्या स्त्रीने दर्भ अंथरून त्यांवर शयन करावें. स्वस्थमनाने एकांती बसावें. कोणास स्पर्श करूं नये. तिने तीन दिवस मौन धारण करावे. किंवा देवाधर्माच्या गोष्टी बोलूं। नयेत. मालतीची वेल, मोगरीची वेल किंवा कुंदाची वेल तिने तीन दिवस हातांत धरावी. आपले शील, रक्षण करावे. तीन दिवस दही, दूध वगैरे गोरसावांचून एक वेळ भोजन करावे. तिने डोळ्यांत अंजन, घालू नये. अंगाला तेल लावू नये. माळा व अलंकार घालू नयेत. तिने देव, गुरु, राजा आणि कुलदेवता ह्यांचे दर्शन करूं नये. गुरु वगैरे ह्यांच्याशी भाषण करूं नये. दर्पणांत आपले मुख पाहूं नये. झाडाखाली व माचा किंचा बाजले ह्यांच्यावर; व अंथरुणावर निजू नये. दिवसां निजू नये. पंचनमस्कार मंत्र आणि जिनदेव ह्यांचे मनांत स्मरण करावें. तिने तीन दिवस आपल्या ओंजळीत किंवा पानावर,2
VeeraoMomoeowww
Ce
For Private And Personal Use Only