________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वाकाचार, अध्याय बारावा. पान ६६२.
wave
तिसरे मत.
अन्यत् - कागा मेजा छद्दी रोहण रुहिरं च अंसुपादं च ॥ जण्हू हेठा परिसं जण्डवरिवदिकमो चेव ॥ ५७ ॥
अर्थ- दुसऱ्यांचें मत सांगतात. यति भोजनाच्या निमित्ताने निघाला असतां त्याच्या मस्तकावर कावळा वगैरे पक्ष्यानें हगणें हा काकांतराय होय. यतीच्या पायाला अशुद्ध पदार्थाचा स्पर्श होणें हा अमेध्यांतराय होय. यतीला ओकारी येणें हा छर्दि नांवाचा अंतराय होय. यतीला मार्गात कोणी अडविणें हा रोधनांतराय होय. आपल्या अंगांतून अथवा दुसऱ्याच्या अंगांतून रक्त आलेले दृष्टीं पडणें हा रुधिरांतराय होय. आपल्या नेत्रांतून अश्रु येणें किंवा दुसयाच्या नेत्रांतून आलेले पाहणे हा अश्रुपातांतराय होय. यतीच्या गुडघ्याच्या खालीं स्पर्श होणें हा जान्वधः परामर्श नांवाचा अंतराय होय. गुडघ्यांच्या वर स्पर्श होणें हा जानूपारिव्यतिक्रम नांवाचा अंतराय होय.
णाहिअहोणिग्गमणं पञ्चखिखदसेवणा य जंतुवहो ॥ कागादिपिंडहरणं पाणीदो पिंडयडणं च ॥ ५८ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ — यतीनें श्रावकाच्या घरांत प्रवेश करतांना दार लहान असल्यामुळे नाभीच्या खालीं डोकें जाईल इतकें वांकून प्रवेश करणें हा नाभ्यधोनिर्गमन नांवाचा अंतराय होय. ज्या वस्तूचा ?
For Private And Personal Use Only