________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६६६.
NNNNNNNNN
शौचमूलो भवेद्धर्मः सर्वजीवदयाप्रदः ॥ पवित्रत्वद्याभ्यां तु मोक्षमार्गः प्रवर्तते ॥ ६६ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ — शुद्धता हे ज्याचें मूल आहे असा धर्म, सर्वजीवांविषयीं दया उत्पन्न करणारा होतो. ह्मणून शुद्धता आणि दया ह्या दोहोंच्या योगानें मोक्षमार्ग प्रवृत्त झाला आहे.
यतीचे भोजन.
यथालब्धं तु मध्याह्ने प्रासुकं निर्मलं परम् ॥
भोक्तव्यं भोजनं देहधारणाय न भुक्तये ॥ ६७ ॥
अर्थ -- मध्यान्हाच्या वेळीं निर्जंतुक आणि अतिशय निर्मल असें अन्न जसले मिळेल तसले यतीनें देहधारण होण्याकरितां भक्षण करावें. भोजन करावयाचे अणून नव्हे. तात्पर्य, यतीर्ने अन्नाची रुचि पहात बसूं नये.
मनोवचनकायैश्च कृतकारितसम्मतैः ॥
नवधा दोषसंयुक्तं भोक्तुं योग्यं न सन्मुनेः ॥ ६८ ॥
अर्थ – मन, वचन आणि शरीर व त्या प्रत्येकाचें कृत, कारित, अनुमोदन ह्या नऊ प्रकारच्या दोषांनी युक्त असलेले अन्न चांगल्या यतीनें भक्षण करूं नये.
For Private And Personal Use Only