________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६८१.
तदन्नं गृह्यतेऽत्यर्थ स्रावितो दोष उच्यते ॥ १११ ॥
अर्थ — ज्या अन्नांतून तूप, ताक वगैरे पुष्कळ गळत आहे तसलें अन्न फार भक्षण करणें हा स्त्रावित नांवाचा दोष होय.
अपरिणतदोष.
त्रिफलादिरजोभिश्च रसैश्चैव रसायनैः ॥
गृह्णात्यपरिणतं वै दोषोऽपरिणतः स्मृतः ॥ ११२ ॥
अर्थ - त्रिफला वगैरेंच्या चूर्णानीं किंवा रसांनीं अथवा रसायनांनी युक्त असलेले अन्न भक्षण करणें हा अपरिणत नांवाचा दोष होय. कारण, ह्यांतील त्रिफलाचूर्ण वगैरे पदार्थ शिजलेले नसतात.
सावरणदोष.
गीतनृत्यादिकं मार्गे कुर्वन्नानीय चान्नकम् ॥
गृहे यद्दीयते दोषः स साधारणसञ्ज्ञकः ॥ ११३ ॥
अर्थ- मार्गीत गायन, नृत्य इत्यादिक व्यापार करून अन्न मिळवून घरी आणून तें अन्न यतीला देणें हा साधारण नांवाचा दोष होय.
दायकदोष.
For Private And Personal Use Only