________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६६१ Paneerseeneaamerawarene-ownewww eeeeeeee
eg (न वाळलेले भाजी वगैरे पदार्थ) भोजनांत असणे, आत किंवा गैद्र अशा प्रकारचे चिंतन होणे, कामचेष्टा उत्पन्न होणे, एकाएकी अशक्तपणा आल्यामुळे खाली बसणे किंवा मूर्छा येऊन पडणे, हातांतून घास गळणे, अव्रती मनुष्याचा स्पर्श होणे, हे मांस असावे असे आपल्यास वाटणे, हे बत्तीस-मुनीच्या भोज-3 नाचे-अंतराय आहेत. ह्यांपैकी कोणताही अंतराय झाला असतां मुनीने भोजनाचा त्याग करावा.
ह्याविषयी दुसरे मत. मतान्तरम् ॥ विमूत्राजिनरक्तमांसमदिरापूयास्थिवान्तीक्षणा-॥
दस्पृश्यान्त्यजभाषणश्रवणतास्वग्रामदाहेक्षणात् ।। प्रत्याख्यानानिषेवणात्परिहरेद्रव्यो व्रती भोजने।
प्याहारं मृतजन्तुकेशकलितं जैनागमोक्तक्रमम् ॥ ५६॥ अर्थ- आता ह्या भोजनांतरायाविषषीं दुसरे मत सांगतात. विष्ठा, मूत्र, चर्म, रक्त, मांस, मद्य, पू, अस्थि आणि वांति ह्यांपैकी कोणताही जिन्नस भोजनाच्या जागी दिसणे, अंत्यजादिकांचा शब्द ऐकू येणे, आपण ज्या गांवांत रहातो त्या गांवाला आग लागणे, ज्या पदार्थाचा त्याग केला आहे ते पदार्थ भोजनांत असणे, आणि अन्नांत मेलेला जीव किंवा केश सांपडणे हे यतीच्या भोजनाचे अंतराय समजावेत. ह्यांपैकी कोणतीही गोष्ट घडली असतां यतीने भोजनाचा त्याग करावा.
Veeway
Petert.evereAVAJAVMeeeee
PMENT
For Private And Personal Use Only