________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा पान ६४२.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
New
NNNNNNNNNNN
उत्तम कुलांत उत्पन्न झालेली, जिचा विटाळ बंद झाला आहे अशी आणि जिच्यामध्ये कोणताही दोषअर्थात् पुत्रसंतति न होणें ह्यावांचून कोणताही दोष नाहीं अशी स्त्री फक्त शास्त्रानें त्याज्य होते. धर्मकृत्यांत तिचा त्याग केला पाहिजे असें नाहीं.
सुरूपां सुप्रजां चैव सुभगामात्मनः प्रियाम् ॥ धर्मानुचारिणीं भार्या न त्यजेद्गृहसद्व्रती ॥ १९७ ॥
अर्थ- सुरूप, जिला प्रजा चांगली होते आहे अशी, भाग्यशालिनी, आपल्याला प्रिय असलेली आणि धर्माचरण करणारी अशी जी स्त्री तिचा सद्गृस्थानें केव्हांच त्याग करूं नये.
भार्या मृत झाल्यास विवाहाचा काल.
प्रमदामृतवत्सरादितः । पुनरुद्वाहविधिर्यदा भवेत् ॥
विषमे परिवत्सरे शुभः । समवर्षे तु मृतिप्रदो भवेत् ॥ १९८ ॥
अर्थ - पत्नी मृत झाल्यापासून दुसरा विवाह ज्यावेळीं होईल, त्यावेळीं तो विषम संवत्सरांत झाला असतां शुभ समजावा. आणि सम संवत्सरांत झाला असतां मृत्युदायक होतो. दुसरें मत
मतान्तरम् — पत्नीवियोगे प्रथमे च वर्षे । नो चेद्विवर्षे पुनरुद्धहेत्सः ॥
Des
For Private And Personal Use Only