________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६०६.
AL
Des
अर्थः-- त्या वेदीच्या पश्चिमेच्या अंगास एक भिंत दोन हात लांब, तीस बोटें उंच आणि वारा है अंगुले रुंद अशी घालावी. त्या भिंतीच्या दोही बाजूस आठ आठ पायया कराव्यात, आणि त्या भिंतीच्या शेवटास एक कलशाकार कळस करावा. असें पूजाशास्त्र जाणणा-यांचे मत आहे.
पीठाचे ( पाटाचें ) प्रमाण.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अथ पीठं- अष्टत्रिंशांगुलं दीर्घमुन्नतं स्याच्छडंगुलम् ॥ अष्टांगुलं च विस्तारं कुर्यादौदुम्बरादिना ॥ १०३ ॥
अर्थ - आतां पीठाचें ( पाटाचे) प्रमाण सांगतात. पीठ अडतीस अंगुले लांब, सहा अंगुलें उंच आणि आठ अंगुले रुंद असे उंबराच्या वगैरे काष्ठाचें करावें.
विवाहः स्याद्दिने यस्मिन्दिवा वा यदि वा निशि ॥ होमस्तत्रैव कर्तव्यो यथानुक्रमणेन तु ॥ १०४ ॥
अर्थ -- विवाह दिवसा किंवा रात्रीं ज्या दिवशीं असेल त्याच दिवशीं अनुक्रमानें जशा प्राप्त होतील, त्याप्रमाणें क्रिया करून, होम त्याच दिवशीं करावा.
विवाहांत सप्तपदीची आवश्यकता. तावद्विवाहो नैव स्याद्यावत्सप्तपदी भवेत् ॥
१८
For Private And Personal Use Only