________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा.
पान ६३१.
222ETED
समित्समारोपणपूर्वकं तथा । हुताशपूजावसरार्चनं मुदा ॥
गृहीतवीटी च वरो वधूयुतो । विलोकना है स्वपुरं व्रजेत्प्रभोः ॥ १६६ ॥ ततः शेषहोमं कृत्वा पूर्णाहुतिं कुर्यात् ॥
ॐ रत्नत्रयार्चनमयोत्तमहोमभूति । र्युष्माकमावहतु पावनदिव्यभूतिम् ॥ षट्खण्डभूमिविजयप्रभवां विभूतिं । त्रैलोक्यराज्यविषयां परमां विभूतिम् १६७ इति भस्मप्रदानमन्त्रः ॥
अर्थ - मग उपाध्यायानें सांगितल्यावर वधूवरांनी एकमेकांच्या जवळ यावें; आणि एका मंचकावर बसावें, आणि पुढील सर्व क्रिया झाल्यावर सोडलेले कंकण आणि सूत्र हीं दोनीं तांबूल आणि तांदूळ ह्यांसह ठेवावीत. मग समिधेच्या ठिकाणीं अग्नीचा समारोप करून अग्नीची पूजा करावी. नंतर सर्व मंडळींचा सत्कार करून वरानें विडा घेऊन आपल्या पत्नीसह आपल्या नगरीस गमन करावें. असा विधि करावयाचा आहे. त्यांत प्रथम राहिलेला होम समाप्त करून अग्रींत पूर्णाहुति घालून “ ॐ रत्नत्रयार्चनमयोत्तम " इत्यादि मंत्रानें अनीतील भस्म ग्रहण करावें.
सुवर्णप्रदानमंत्र. हिरण्यगर्भस्य हिरण्यतेजसो । हिरण्यवत्सर्वसुखावहस्य ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
DEDETEANNA
For Private And Personal Use Only