________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा
reier
पान ६३५. ACAD
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ:- विवाहकर्म समाप्त झाल्यावर वराने आपल्या पत्नीसह आपल्या घरीं गमन करावें. घर जर दुसया गांवीं असेल, तर कांहीं तरी वाहनावरून तेथे जावें.
गृहप्रवेश.
विवाहमारभ्य वधूप्रवेशो ॥ युग्मे दिने षोडशवासरावधि ॥
न चासमाने यदि पञ्चमेऽह्नि । शस्तस्तदृर्ध्व न दिवा प्रशस्तः ॥ १७ ॥ अर्थ- वराच्या घरांत वधूचा प्रवेश विवाह झाल्यापासून सोळा दिवसांच्या आंत कोणत्याही दिवशीं करावा. विषमदिनीं करूं नये. विषमदिवशींच जर करण्याचा प्रसंग आला तर पांचव्या दिवशी करावा. त्याच्या पुढे कोणत्याही विषमदिवशीं करूं नये. तसें दिवसां वधूप्रवेश करूं नये.
वधूप्रवेशनं कार्य पञ्चमे सप्तमेऽपि वा ॥
नवमे वा शुभे वर्षे सुलग्ने शशिनो बले ॥ १७८ ॥
अर्थ -- वधूप्रवेश पांचव्या, सातव्या किंवा नवव्या वर्षी शुभ लग्नावर चंद्रबल असतांना करावा. उद्वाहे चतुरष्टषदशदिने शस्तं वधूवेशनं । मासे तु द्विचतुः षडष्टदशसु श्रीपञ्चमायुःप्रदम् ॥
वर्षे तु द्विचतुः षडष्टमशुभं पञ्चाष्टमुख्या परैः ( 2 ) ।
For Private And Personal Use Only