________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५८८. TerwonMancaanANANDANANUncakeeeeewanes १ सहवर्तमान ती कन्या वरपित्याच्या हाती द्यावी. आणि “दास्येऽहं" इत्यादि श्लोक ह्मणावा. (माझी ही रूपावती कन्या आज तुझ्या पुत्राला मी देतो. विवाहाकरितां तूं मंगलद्रव्ये संपादन कर!) मग वरपित्याने ? “स्वीकृता मम ( तुझी कन्या आज मी माझ्या पुत्राकरितां स्वीकारली.") असें ह्मणावें. नंतर जसा ? आचार असेल त्याप्रमाणे फल, अक्षता, तांबूल वगैरे एकमेकांनी एकमेकांस द्यावे. हा वाग्दानविधि सांगितला.
प्रदानविधि. अथ प्रदानम् ।। कन्याया वरणात्पूर्व प्रदानं चैव कारयेत् ॥
सम्पूज्य कन्यकां दद्यादत्रालङ्कारभूषिताम् ॥ ४९ ॥ प्रदानं पदकूलादि कर्णकण्ठादिभूषणम् ॥
लब्ध्वाऽऽशिषोऽथ विप्रेभ्यस्तेभ्यो दद्यात्फलानि च ॥ ५० ॥ अर्थ- कन्यावरणविधि होण्याच्या पूर्वी प्रदानविधि करावा. हा विधि वरपित्याने करावा. त्याने वस्त्रालंकाराने भूषित असलेल्या कन्येचे पूजन करून तिला पट्टवस्त्र (पैठणी वगैरे उंची वस्त्र ), गळ्यांत कानांत वगैरे घालण्याचे अलंकार द्यावेत. नंतर ब्राह्मणांपासून आशीर्वाद ग्रहण करून, त्यांना तांबूल) फल वगैरे द्यावें.
वरणविधि.
NAGAME
MeUNAGAerseas
For Private And Personal Use Only