________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पान १९२.
ANNNNNNNN
認
स्नान करून शुद्ध वस्त्रें धारण करून, ब्राह्मणांशीं सह ग्रहयज्ञ करावा. त्या दिवशीं प्रातःकाली वराला ? हळद लावून मंगल स्नान घालून वस्त्रालंकारांनीं सुभोभित करावें. वराच्या मातेनें सुवासिनी स्त्रिया आपल्या बरोबर घेऊन, स्वतः दोन कलश घेऊन वाजतगाजत एका जलाशयावर जावें. आणि त्या ठिकाणीं फल, गंध, अक्षता, फुले ह्यांच्या योगानें जलदेवतांचे पूजन करून ते दोनी कलश पाण्याने भरून आपल्या मस्तकावर घेऊन जिनालयांत गमन करावें. येतानां बरोबर थोडी शुद्ध मृत्तिका आणलेली असावी. त्या मृत्तिकेंत धान्याचें बीज पेरावें. आणि एका कलशांतील पाणी त्या मृत्तिकेवर घालून दुसरा कलश वेदीच्या आग्रभागी ठेवून त्याचें मंगलद्रव्यांनी पूजन करावें. वेदीवर आपल्या कुलदेवतेची स्थापना करून तिच्यापुढे दीप लावून ठेवावा. दगडाचा पाटा आणि वरवंडा ह्या दोनीला सुतानें गुंडाळून ते वेदीच्या आग्रभागी ठेवावेत. आणि त्यांच्यावर गूळ, जिरे, मीठ, हळद आणि तांदूळ ह्यांचे पांच निरनिराळे पुंज घालावेत. ह्या सर्व विधीस अंकुरविधान ह्मणतात. हा विधि कन्येच्या घरींही करावा. त्या दिवशींचे वराचें कृत्य.
वरः स्नानादियुक् पश्चात्स्वस्तिवाचनपूर्वकम् ॥
होमं विधाय भुन्जीत पित्राचार्यादिसंयुतः ॥ ६५ ॥
अर्थ - नंतर स्नान वगैरे करून बसलेल्या वराने त्याच दिवशीं पुण्याहवाचन करून ग्रहयज्ञ करावा.
For Private And Personal Use Only