________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
-सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय अकरावा.
पान- ५९८. DEDEN
03 AA
अर्थ- आतां ह्याबद्दल दुसरें मत असे आहे कीं, कन्यादान जर रात्रीं व्हावयाचें असेल, तर कन्येच्या पित्यानें दिवसां भोजन करून कन्यादानाच्या वेळीं स्नान करून मंत्रजप करावा. आणि कन्यादान करावे.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
भुक्त्वा समुद्वहेत्कन्यां सावित्रीग्रहणं तथा ॥ गान्धर्वासुरयोरेव विधिरेष उदाहृतः ॥ ८१ ॥
अर्थ- वरानें भोजन करून वधूशी विवाह करावा; असें जें मत आहे, तो विधि गांधर्वविवाह आणि 'आसुरविवाह ह्यासंबंधाचा आहे असे समजावें.
कन्येचे बांधव.
पिता पितामहो भ्राता पितृव्यो गोत्रिणो गुरुः ॥
मातामहो मातुलो वा कन्याया बान्धवाः क्रमात् ॥ ८२ ॥
अर्थ - पिता, पितामह, भ्राता, चुलता, गोत्रजपुरुष, गुरु, मातामह, आणि मातुल हे कन्येचे बांधव क्रमानें समजावेत. हे कन्येचें दान करण्यास अधिकारी आहेत.
कन्यादान करणारा कोणी नसल्यास,
पित्रादिदानभावे तु कन्या कुर्यात्स्वयंवरम् ॥
For Private And Personal Use Only