________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनवृतत्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५६५.
AAVATMAVALA
अर्थ:- संध्या, अध्ययन ( स्वाध्याय) पूजा वगैरे कर्मे करण्याविषयीं तत्पर असून, दान करणारा उपभोग घेणारा व जीवदया करणारा असा जो असेल तो उत्तम गृहस्थ समजावा.
वानप्रस्थलक्षण.
प्रतिमैकादशधारी ध्यानाध्ययनतत्परः ॥
प्राक्कषायाद्विदूरस्थो वानप्रस्थः प्रशस्यते ॥ १३६ ॥
अर्थ - अकराही प्रतिमा धारण करणारा, ध्यान आणि अध्ययन ह्यांविषयीं तत्पर असलेला व सर्व कषायांचा ज्यानें त्याग केला आहे असा जो असेल तो वानप्रस्थ समजावा.
भिक्षुलक्षण. सर्वसङ्गपरित्यक्तो धर्मध्यानपरायणः ।
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ध्यानी मौनी तपोनिष्ठः स ज्ञानी भिक्षुरुच्यते ॥ १३७ ॥
अर्थ --- ज्याने सर्वसंगपरित्याग केला आहे, व जो धर्मध्यानांत आसक्त असून मौन धारण करून तपश्चर्या करीत असेल तो भिक्षु समजावा. पुढें आठवी प्रतिमा सांगतात.
आरंभनिवृत्ति.
सेवा कृषिवाणिज्यप्रमुखारम्भतो व्युपरतिः ।।
NNNNNe
For Private And Personal Use Only