________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५४४.
BAAVA
न्यासापहारिताप च व्यतिक्रमाः पञ्च सत्यस्य ॥ ७८॥ अर्थ- दुसऱ्याची निंदा करणे, गुप्त गोष्ट सांगणे, चहाडी करणे, खोटा लेख लिहिणे आणि दुस-१ न्याची ठेव घेणे हे पांच सत्याणुव्रताचे अतीचार आहेत. ते करूं नयेत.
अचौर्याणुव्रताचे स्वरूप.. निहितं वा पतितं वा सुविस्मृतं वा परस्वमविसृष्टम् ॥
न हरति यन्न च दत्ते तदकुशचौर्यादुपारमणम् ॥ ७९ ॥ 8 अर्थ-- ठेवलेली, पडलेली, किंवा विसरलेली अशी दुसऱ्याची वस्तु त्याने दिल्यावांचून आपण न घेणे, व दुसऱ्यास न देणे ह्यास स्थूलचौर्यविरति किंवा अचौर्याणुव्रत ह्मणतात.
अचौर्याणुव्रताचे अतीचार. चौरप्रयोगचौरादानविलोपसदृशसम्मिश्राः॥
हीनाधिकविनिमानं पञ्चास्तेये व्यतीपाताः ॥ ८० ॥ " अर्थ-चोरीचा उपाय सांगणे, दुसऱ्याने चोरलेले पदार्थ घेणे, राजाची आज्ञा मोडणे, अधिक किमतीच्या पदार्थात कमी किमतीचा पदार्थ मिसळणे आणि माप कमीजास्ती करणे हे अचौर्यव्रताचे पांच अतीचार आहेत.
Reeseen
For Private And Personal Use Only