________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सामसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान १४३.
अहिंसाणुनताचे अतीचार, छेदनवन्धनपीडनमतिभारारोपणं व्यतीचाराः ॥
आहारवारणाऽपि च स्थूलवधायुपरतेः पञ्च ॥ ७६ ॥ १ अर्थ-कोणाला तरी कापणे, बांधून घालणे, पीडा देणे, अतिशय ओझें घालणे आणि आहार न देणे हे अहिंसाणुव्रताचे पांच अतीचार आहेत. ते अहिंसाणुवत करणाऱ्याने करूं नयेत.
सत्याणुव्रताचे स्वरूप. स्थूलमलीकं न वदति न परान्वादयति सत्यमपि विपदे ॥
यत्तदन्ति सन्तः स्थूलमृषावादवैरमणम् ॥ ७७॥ __ अर्थ- मोठे खोटें न बोलणें ( लोकांस हे बोलणे खोटें असें जें सहज समजण्यासारखे आहे, तसलें। भाषण आपण स्वतः न बोलणे ) दुसऱ्याकडून न बोलविणे आणि दुसऱ्याला ज्यामुळे त्रास भोगावा लागेल असें खरें भाषणही स्वतः न करणे, व दुसन्याकडून न करविणे, ह्यास स्थूलासत्यविरति किंवा सत्याणुव्रत असें विद्वान् लोक ह्मणतात.
सत्याणुव्रताचे अतीचार. परिवादरहोभ्याख्यापैशुन्यं कूटलेखकरणं च ॥
For Private And Personal Use Only