________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Mee
सोमसेनकृत वार्णिकाचार, अध्याय दहावा. पान १४५.
परदारनिवृत्ति अणुव्रताचे स्वरूप. न च परदारान् गच्छति न परान् गमयति च पापभीतेर्यत् ॥
सा परदारनित्तिः स्वदारसन्तोषनामापि ॥ ८१ ॥ अर्थ- पापाच्या भीतीमुळे परस्त्रीशी आपण समागम न करणे आणि दुसऱ्याकडून न करविणे, आणि स्वस्त्रीविषयी संतुष्ट असणे, ह्याला परदारविरति नांवाचे अणुव्रत ह्मणतात.
परदारनिवृत्त्यणुव्रताचे अतीचार. अन्यविवाहकरणानङ्गक्रीडाविटत्वविपुलतषः ।।
इत्वारिकागमनं चास्मरस्य पञ्च व्यतीचाराः।। ८२ ॥ अर्थ-दुसऱ्याचे लग्न जुळविणे किंवा करणे, भलत्याच इंद्रियाचे ठिकाणी कामलीला करणे,, कामोत्पादक भाषण बोलणे, स्वस्त्रीविषयी अत्यंत आसक्ति करणे आणि वेश्येकडे कामसेवनाकरिता जाणे, हे पांच परदारविरतिव्रताचे अतीचार आहेत, ते करूं नयेत.
परिग्रहपरिमाणाणुव्रताचे स्वरूप. धनधान्यादिग्रन्थं परिमाय ततोऽधिकेषु निस्पृहता ।।
परिमितपरिग्रहः स्यादिच्छापरिमाणनामाऽपि ॥ ८३ ॥ Kavericawwwesentawasnawwwwweseaveewancreennesses
UWWWGOVUU930
For Private And Personal Use Only