________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
सोमसेनकृत
सर्वसंग परित्याग करून जे मुनि झाले जें चारित्र तें विकल होय.
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
वणिकाचार, अध्याय दहावा. पान ५३९.
CAN
त्यांचें चारित्र सकल होय, आणि जे गृहस्थ असतात त्यांचें ?
सागाराचे लक्षण.
अनाद्यविद्यादोषोत्थचतुः सञ्ज्ञाज्वरातुराः ॥
शश्वत्सरज्ञानविमुखाः सागारा विषयोन्मुखाः ।। ६६ ।
अर्थ - सागार [ गृहस्थ ] हे अनादिकालापासून प्राप्त झालेल्या अज्ञानापासून उत्पन्न झालेला जो चतुःसंज्ञारूपी ज्वर [ आहार, भय, मैथुन आणि परिग्रह ह्या चार संज्ञा होत ] त्याने पीडित झालेले असतात. सम्यग्ज्ञान प्राप्त करून घेण्याविषयीं नेहमीं विमुख असतात, आणि विषयसेवनाविषयीं अत्यंत उत्सुक असतात, ह्मणून असे जे असतात त्यांनाच सागार ह्मणतात.
गृहस्थो मोक्षमार्गस्थो निर्मोहो नैव मोहवान् ॥
अनगारो गृही श्रेयान् निर्मोहो मोहिनो मुनेः ।। ६७ ।।
अर्थ — कोणी गृहस्थ मोक्षमार्गप्रवृत्त असून मोहरहित असा जर असेल तर तो देखील अनगारच होय, आणि ज्यानें घर सोडलें आहे परंतु मोह सुटला नाहीं, तो अनगार नव्हे. ह्मणून मोहयुक्त असलेल्या 2 मुनीपेक्षां मोहरहित असलेला गृहस्थ फार चांगला.
For Private And Personal Use Only