________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान १६९. गृहमानीय यक्षादीनामयं दत्वा पुण्याहवाचनः पुनः सिंचयित्वा सज्ज
नान् भोजयेत् ॥ इति चौलकर्म ॥ अर्थ- मग त्या मुलाचे मस्तकावरील सर्व केश उष्णोदकाने धुवून 'ॐ हीं पंचपरमेष्ठि-० ' इत्यादि। मंत्र ह्मणून मुलाच्या पित्यानें क्षुर नापिकाकडे ( हजामाकडे ) द्यावा. नापितानेही 'भवदीप्सितार्थो ? भवतु' असें ह्मणून त्या मुलाच्या मस्तकावर शेंडी राखून बाकीचे केश काढावेत. मग ते पूर्वीचे केश दूध, तूप, धान्याची पात्रे आणि गोमयाचे पात्र ह्या सर्ववस्तु मंगलवाद्यांचा घोष करीत नदीत, नदी नसल्यास ९ तलावांत अथवा विहीरांत नेऊन टाकावीत. मग तेथे कुमाराला स्नान घालून वस्त्रभूषणांनी अलंकृत करून तसाच मंगलवाद्यांचा घोष करीत घरी आणावें. मग यक्षादिदेवतांना अर्घ्यप्रदान करून पुण्याहवाचनमंत्रांनी मुलाच्या मस्तकावर सेंचन करवावें. ह्याप्रमाणे विधि झाल्यावर सदाचारसंपन्न अशा आपल्या स्वजातीयांना भोजन घालावे. हा चौलाचा विधि सांगितला.
लिपिसंख्यान [ अक्षराभ्यास] द्वितीयजन्मनः पूर्वमक्षराभ्यासमाचरेत् ॥ मौजीवन्धनतः पश्चाच्छास्त्रारम्भो विधीयते ॥ १६३ ।। पञ्चमे ससमे चाब्दे पूर्व स्यान्मौञ्जिवन्धनात् ॥
For Private And Personal Use Only