________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा.
पान ५२४.
ANNANTERR
असंमति दाखविणें, त्याची स्तुति न करणें ह्याला अमूढदृष्टि नांवाचें सम्यक्त्वांग ह्मणतात.
उपगूहन.
स्वयंशुद्धस्य मार्गस्य बालाशक्तजनाश्रयाम् ॥
वाच्यतां यत्प्रमार्जन्ति तद्वदन्त्युपगूहनम् ॥ २४ ॥
अर्थ — स्वभावतः शुद्ध असलेल्या अशा धर्ममार्गाची (जैनधर्माची) लहान मुले किंवा मूर्खलोक व अशक्त लोक ह्यांच्या वर्तनामुळे जी निंदा होते, ती घालविणें ह्याला उपगूहन नांवाचें अंग ह्मणतात.
स्थितीकरण. दर्शनाच्चरणाद्वाऽपि चलतां धर्मवत्सलैः ॥
प्रत्युपस्थापनं प्राज्ञैः स्थितीकरणमुच्यते ॥ २५ ॥
अर्थ- सम्यग्दर्शन आणि सम्यक्चारित्र ह्यापासून भ्रष्ट होत असलेल्या लोकांना धर्माविषयीं प्रेम करणाऱ्या शहाण्या लोकांनीं ताळ्यावर आणणें ह्याला उपगूहन नांवाचे अंग ह्मणतात.
वात्सल्य.
जैनधर्मयुतान् भव्यान् रोगचिन्तादिपीडितान् ॥ वैयावृत्यं सदा कुर्यात्तद्वात्सल्यं निगद्यते ॥ २६ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only