________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा.
~~a
अर्थ - क्षायिकसम्यक्त्व ( सम्यक्त्वाला प्रतिबंध करणाऱ्या कर्माचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारें 2 सम्यक्त्व ) औपशमिकसम्यक्त्व [ प्रतिबंधक कर्माच्या उपशमामुळे झालेलें सम्यक्त्व ] आणि क्षायोपशमिकसम्यक्त्व [ सम्यक्त्वप्रतिबंधककर्माचा यत्किंचित् अनुदय आणि यत्किंचित् उदय यांपासून उत्पन्न होणारें सम्यक्त्व ] असें सम्यक्त्व तीन प्रकारचे आहे. त्यांत पहिलें उत्तम, दुसरें मध्यम आणि तिसरें कनिष्ठ समजावें. तीन प्रकारचें सम्यक्त्व.
पान ५२९.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
मिथ्यासमयमिध्यात्वसम्यक्प्रकृतयस्त्रयः ॥
आयं कषायतुर्ये च चतुः प्रकृतयः पुनः ॥ ३८ ॥ क्षायिकं च क्षयात्तासां शमनाचौपशमिकम् ॥ मिश्रात्तन्मिश्रसम्यक्त्वमिति मोक्षप्रदायकम् ॥ ३९ ॥
अर्थ:- मिध्यात्व, समयमिथ्यात्व, सम्यक्प्रकृति आणि अनंतानुबंधी असे क्रोध, मान, माया, लोभ ह्या सात प्रकृति आहेत. ह्यांच्या क्षयापासून क्षायिकसम्यक्त्व उत्पन्न होते. उपशमापासून औपशमिक सम्यक्त्व उत्पन्न होतें. आणि क्षय व उपशम या दोहोंपासून क्षायोपशमिक किंवा मिश्र सम्यक्त्व होतें. असें हें सम्यक्त्व मुक्तीला कारण आहे.
सम्यक्त्वाचे आठ गुण.
For Private And Personal Use Only