________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय नववा.
पान ४९२.
Las ENAB evverMINA
मुदा ॥ ५० ॥ एवं कृते न मिध्यात्वं लौकिकाचारवर्तनात् ॥ भोजनानन्तरं सर्वान् सन्तोष्य निवसेद्गृहे ॥ ५१ ॥ प्रतिमासं क्रियां कुर्या -
दोमपूजापुरःसरा ॥ श्रवणे तु विशेषेण सा क्रियाऽऽवश्यकी मता ॥ ५२ ॥
अर्थ - पूर्वी सांगितल्याप्रमाणें उपनयन झाल्यापासून चवथ्या दिवशीं त्या कमारानें आपल्या पित्याच्या सनिष ( चौकन्हाणांत ) स्नान करून, होम, पूजा, वगैरे कृत्य संक्षेपानें यथाविधि करावें. मग शुद्ध जाग्यांत असलेला, उंच आणि न जळलेला व न तोडलेला असा एक सुंदर पिंपळाचा वृक्ष पाहून त्याची पूजा करण्याकरितां त्या ठिकाणीं कुमाराने गमन करावें. दर्भ, पुष्पाच्या माला, हळदीनें रंगविलेलें सूत, ह्यांच्या योगाने त्या पिंपळाच्या डहाळीला सुशोभित करून, त्याच्या मुळाला पाणी वालावे. त्या वृक्षाच्या पूर्वेकडील बाजूस स्थंडिल घालून त्यावर अग्नि तयार करावा. आणि त्या अग्नीत तूप वगैरे पदार्थ आणि नऊ नऊ समिधा यांच्या योगानें होम करावा. नंतर " हे महावृक्षा ! माझी सर्व चिन्हें मी तुला समर्पण करीत आहे. तुझ्याप्रमाणे माझाही यज्ञकर्मति उपयोग हा तुझ्याप्रमाणें माझ्या ठिकाणीही पवित्रत्व असूं दे ! आणि तुझ्याप्रमाणे माझ्या ठिकाणी बोधित्व असूं दे. तूंही माझी चिन्हें धारण कर. " माणे त्या सर्व मंगलाला साघनीभूत असलेल्या वृक्षाची प्रार्थना करून व अग्निसहित त्या वृक्षाला तीन प्रदक्षिणा करून नंतर त्या बटूनें आनंदाने आपल्या घरीं जावें. 2
For Private And Personal Use Only