________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय नववा, पान ४९५.
१ वखाकरितां असावें. कारण वस्त्र नसल्यास त्याचा उपयोग होतो. यज्ञोपवीत तालूच्या छिद्रापासून नाभीपर्यंत । लांब असावे. त्यापेक्षा न्यून असल्यास रोगोत्पत्ति होते. आणि अधिक असल्यास धर्माचा नाश होतो. आयुष्याची इच्छा करणाऱ्याने दोन किंवा तीन यज्ञोपवीतें घालावीत. आणि पुत्राची इच्छा करणाऱ्याने व धार्मिक होण्याची इच्छा करणा-याने पांच यज्ञोपवीतें घालावीत. एकर यज्ञोपवीत घालून जर जप होम वगैरे : कृत्य केले तर ते कृत्य निष्फल होते. आणि धर्मकृत्याची सिद्धि होत नाही. ज्यावेळी यज्ञोपवीत गळ्यांतून पडेल किंवा तुटेल, त्यावेळी स्नान करून दुसरें यज्ञोपवीत धारण करावें. दोन किंवा अधिक यज्ञोपवीतें, धारण करणान्यांनी प्रत्येक यज्ञोपवीत धारण करतांना मंत्र आणि संकल्प वेगळा वेगळा ह्मणावा, आणि यज्ञोपवीत धारण करावे. असें मुनींनी सांगितले आहे. कारण, एकदाच मंत्र ह्मणून जर सर्व यज्ञोपवीतें: एकदम धारण केली तर ती सर्व एकरूप झाल्यामुळे त्यांतील एक तुटले असतां ती सर्व तुटली असे समजावे लागेल; ह्यांत संशय नाही.
यज्ञोपवीत नुटले असतां. यज्ञोपवीतं चानन्तं मुजी दण्डं च धारयेत् ।।
नष्ट भ्रष्टे नवं धृत्वा नष्टं चैव जले क्षिपेत् ॥ १२॥ अर्थ-- यज्ञोपवीत, अनंत, मुंजी आणि दंड ह्या वस्तु बटूनें सर्वदा धारण कराव्यात. ह्यांपैकीं यज्ञो
For Private And Personal Use Only