________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा.
पान ४२२.
se
evereveren
आचार्यस्तं करे धृत्वा पुण्याहवचनैवरैः ॥ सिञ्चयेद्दम्पती तौ च पुण्यक्षेमार्थचिन्तकः ॥ १८ ॥
अर्थ — मग आचार्यानें तो कलश हातांत घेऊन “ त्या दंपत्याचें कल्याण व्हावें, त्यांना पुण्य घडावें, "त्यांना द्रव्यप्राप्ति व्हावी " अशा प्रकारचें मनांत चिंतन करून पुण्याहवाचनमंत्रांनी त्या दंपत्यावर कुंभांतील 'जलानें अभिषेक (सेंचन ) करावा.
त्रिःपरीत्य ततो वहिं तत्र चोपविशेत्पुनः ॥ सौभाग्यवनिताभिश्च कुङ्कुमैः परिचर्चयेत् ॥ १९ ॥ नीराजनां ततः कृत्वा वर्धयेच जलाक्षतैः ॥
वस्त्रताम्बूलभूषाभिः पूज्यौ तौ ताभिरादरात् ॥ २० ॥
अर्थ - अभिषेक झाल्यावर अनीला त्या दंपत्यानें तीन प्रदक्षिणा करून पुनः आपल्या पूर्वीच्या जाग्यावर येऊन बसावें. मग सुवासिनी स्त्रियांनी त्यांना कुंकूं लावावें आणि त्यांना नीराजन ( कुरवंडी ) करून जलयुक्त अक्षतांनी त्यांची वृद्धी करावी. ह्मणजे तुमची दोघांची वृद्धि होवो असें त्यांच्या मस्तकावर अक्षता टाकून ह्मणावें. ह्यावेळी त्या स्त्रियांनी त्या दंपत्याची वस्त्र तांबूल अलंकार ह्या वस्तूंच्या योगानें प्रेमानें पूजा करावी.
For Private And Personal Use Only