________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा.
पान ४३३.
VVVVVVre
मोद क्रिया.
गर्भे स्थिरेऽथ सञ्जाते मासे तृतीयके ध्रुवम् ॥
प्रमोदेनैव संस्कार्यः क्रियामुख्यः प्रमोदकः ।। ५२ ।।
अर्थ- स्त्रीच्या उदरांत गर्भ स्थिर झाल्यावर तिसऱ्या महिन्यांत त्या गर्भाचा प्रमोद नांवाचा संस्कार करावा. हा प्रमोद संस्कार सर्व संस्कारांत मुख्य आहे.
तृतीये गर्भसंस्कारो मासे पुंसवनं च सः
आद्यगर्भो न विज्ञातः प्रथमे मासि वै यदि ॥ ५३ ॥
अर्थ - प्रथमच गर्भवती झालेल्या स्त्रीचा गर्भ पहिल्या महिन्यांत जर ज्ञात झाला नाहीं, तर तिसऱ्या महिन्यांत त्याचा ( गर्भाचा ) संस्कार करावा. ह्मणजे त्या संस्कारानें गर्भिणीच्या उदरांतील गर्भ पुरुष चिन्हांनें युक्त होतो.
तैलाभ्य जलैरादौ गर्भिणीं स्नापयेच ताम् ॥ अलङ्कृत्य च सहस्त्रैः करे फलं समर्पयेत् ॥ ५४ ॥ उपलेपं शरीरे तु संस्कुर्याच्चन्दनादिना ॥ पूर्ववद्धमसत्कार्य जिनपूजापुरःसरम् ॥ ५५ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only