________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४३८. Paswanerveneecancareewerecentervieween&cancer
होम हे विधि पूर्वी सांगितल्याप्रमाणेच करावेत. आचार्याने त्या गर्भिणीला सुवासिनी अशा वृद्ध ३ स्त्रियांकडून मंगलस्नान घालवून वस्त्रभूषणादिकांच्या योगाने सुशोभित करवून, आणि चंदनादि सुगंधिद्रव्यांनी तिच्या शरीराला लेपन वरवून, तांबड्या वस्त्राने आच्छादित केलेल्या पाटावर तिला आणून बसवावे. त्या गर्भिणीला सिंदूर आणि काजळ लावलेले असावें. मग आचार्याने ( उपाध्यायाने) पुण्याहवाचन मंत्रांनी तिच्या मस्तकावर कुंभजलाने सेंचन करावे. आणि पतीकडून तिला तांबूल देववावा.. ९मग जवाचे अंकुर, फुलें, कोवळी पाने आणि दर्भ ह्यांची माला करवून पतीकडून तिच्या कंठांत
घालवावी. नंतर यक्षादिदेवतांना पूर्णाय देऊन आचार्याने शांतिपाठ करावा. त्यावेळी त्या ठिकाणी १ असलेल्या ब्राह्मण वगैरे मंडळींना तांबूल, फल, वस्त्र वगैरे देऊन संतुष्ट करावें. “ॐ झं वं" इत्यादि
मंत्राने गर्भिणीच्या कंठांत यवमाला घालावी. नंतर "झं वं व्हः" इत्यादि मंत्राने तिच्या अग्रभागी क्षीर, दध्योदन १(दहीभात) आणि हरिद्राम्बु (हळदीचे पाणी) ह्या पदार्थांनी भरलेली तीन पात्रे किंवा तीन कलश, ठेवावेत. आणि एखाद्या लहान मुलीला त्यांतील कोणत्याही वस्तूस स्पर्श करण्यास सांगावें. त्या मुलीने) जर पायसाला (क्षीरीला) स्पर्श केला तर गर्भिणीला पुत्र होणार असे समजावें. दध्योदनाला स्पर्श केल्यास कन्या होईल असे समजावें. आणि हलदीच्या पाण्याला स्पर्श केल्यास दोनीही होणार नाहीत,
असे समजावे. झणजे अपत्य झाल्यास नपुंसक होईल, किंवा मरून उपजेल, अथवा उपजल्याबरोबर WwwwwwseemaSAMAvawweeeeeeeeeeeeeevara
For Private And Personal Use Only