________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४४३.
RAUNUAVVVO
करावयाच्या प्रसंगी गुरु किंवा शुक्र ह्यांचा अस्त असला तरी हरकत नाही. कारण, त्या क्रिया करण्याला १ उक्त असलेला महिना हा त्यांचा मुख्य काल आहे. आणि तो मुख्य कालच कोणत्याही क्रियांना १ अवश्यक असल्याने तो इतर दोषांचा नाश करतो. पुंसवन, सीमंत, चौल, उपनयन, गर्भाधान आणि प्रमोद या संस्कारांत नांदीमंगल अवश्य करावें.
गर्भिणीचे धर्म.
अथ गर्भिणीधर्माः॥ भूम्यां चैवोचनीचायामारोहणविरोहणे ॥ नदीप्रतरणं चैव शकटारोहणं तथा ।। ८४ ॥ उग्रौषधं तथा क्षारं मैथुनं भारवाहनम् ।।
कृते पुंसवने चैव गर्भिणी परिवर्जयेत् ॥ ८५ ।। अर्थ-- गर्भिणी स्त्रीचे धर्म सांगतात - गर्भिणी स्त्रीने उंचसखल भूमीवर चढणे उतरणे, नदी तरून जाणे, गाडीत बसणे, जालीम औषध घेणे, खारट पदार्थ खाणे, मैथुन, ओझें वाहणे ह्या गोष्टी पुंसवन संस्कार 2 झाल्यापासून वर्ज कराव्यात.
गर्भिणीच्या पतीचे धर्म.
WaviwwwwVAVameevanivil
For Private And Personal Use Only