________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४४९.
NNNNN
अर्थ — भार्या ज्या जागीं प्रसूत झाली असेल त्या जाग्यावर चार बोटें माती टाकून त्यावर माती आणि शेण ह्यांनीं सारवून घ्यावें. मग पांच प्रकारचें कल्क ज्यांत मिसळले आहे अशा उष्णोदकानें बाळंतिणीनें त्या है मुलासह स्नान करावें. असें स्नान पुढे तीन तीन दिवसांनी शुद्धीकरितां करावें. बाळंतिणीचीं वस्त्रे, अलंकार, अंथरूण पांघरूण, जेवणाची भांडी वगैरे सर्व वस्तु शुद्ध जलाने परटाकडून धुववावीत. मुलाचे जन्म झाल्या दिवसापासून पांचव्या आणि सहाव्या दिवशीं रात्रीं अष्टदिक्पालांची पूजा करून त्यांना बलिदान करावें. गीतवाद्यांचा घोष करावा. रात्री जागरण करावें, दीप लावावेत. आणि शांतिपाठ करावेत. जननाशौचाची मर्यादा.
प्रसूतेर्दशमे चान्हि द्वादशे वा चतुर्दशे ॥
सूतकाशौचशुद्धिः स्याद्विप्रादीनां यथाक्रमम् ॥ १०५ ॥ प्रसूतिगृहे मासैकं दायादानां गृहेषु च ।
दशदिनावधिं यावन्न गच्छेदभुक्तये यतिः ॥ १०६ ॥
अर्थ — प्रसूतिदिनापासून दहाव्या दिवशीं ब्राह्मणाचें जननाशौच निवृत्त होतें. बाराव्या दिवशीं क्षत्रियाचें आणि चवदाव्या दिवशीं वैश्याचें जननाशौच जाते. ज्या घरांत स्त्री प्रसूत झाली असेल त्या घरांत यतीनें एक महिनापर्यंत भोजन करूं नये. त्यांच्या भाईबंदांच्या घरीं दहा दिवस भोजन करूं नये.
For Private And Personal Use Only