________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
RAKeaseenewhereveerea
सामसेनकृत हैवणिकाचार, अध्याय आठवा. पन ४५४. Receetenereceneveerentrerencemenerenceaerveev
छिशुन् ।। १२२॥ अष्टात्तरसहरण नामभियों विराजते ॥ स देवोऽस्मै कुमाराय शुभं नाम प्रयच्छतु ॥ १२३ ॥ इति सम्प्रार्थ्य देवं तं त्रिवारं च द्विजैः सह ॥
यदायाति स तन्नाम घोषयित्वा नमेजिनम् ॥ १२४ ॥ पूर्णाघ यक्षदेवानां दत्वा ___ कौँ निशामुखे ।। संछेद्यान्दोलके रात्रौ बालं प्रीत्या निवेशयेत् ॥ १२५॥
अर्थ-मग निस्तुप केलल्या ( कोंडा काढलेल्या) अक्षता एका ताटांत पसरून मुलाच्या पित्याने त्यावर प्रथम आपले नांव नंतर मुलाला ठेवावयाचें नांव लिहावे. तसेंच दूध आणि तूप मिसळलेले एका दुसऱ्या ताटांत घालून त्यांत मुलाला घालावयाचे दागिने घालून त्या ताटांत आणि पूर्वीच्या ताटांत गध फुले आणि दर्भ टाकावेत. मग मुलाचें मस्तक, दोनी कान, कंठ, दोनी भुजा आणि छाती द्या ठिकाणी ते तूप मिसळलेले दूध, दर्भाने लावून त्याला त्या त्या ठिकाणी घालावयाचे अलंकार घालावेत. मग "अष्टोतरसहस्रेण." ( जो देव एक हजार आठ नामांच्या योगानें शोभत आहे तो देव ह्या कुमाराला शुभनाम देवो)- ह्या मंत्राने ब्राह्मणांशी सहवर्तमान तीन वेळ देवाची प्रार्थना करून, मुलांचे में नांव ठेवावयाचे असेल त्या नांवाचा, मोठ्या स्वरांत उच्चार करून श्रीजिनेंद्राला नमस्कार करावा. आणि नंतर यक्षादिदेवांना पूर्णार्घ्य द्यावेत.. ह्याप्रमाणे सर्व विधि करावा. मग त्या दिवशी सायंकाली मुलाचे दोनी कान टोचावेत. आणि रात्री त्या मुलाला पाळण्यांत घालावें.
i wwwsVANASid
was
For Private And Personal Use Only