________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४३५.
NNNNNN
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
DEM
अर्थ — नंतर त्यांच्या अग्रभागी गंध आणि तांदुळ ह्यांच्या योगानें स्वस्तिक काढून त्यावर पूर्वी ? सांगितल्याप्रमाणे कलश स्थापन करावा. नंतर भक्तियुक्त अंतःकरणानें अनेक प्रकारचे धूप, दीप, उत्तम अन्ने, चांगलीं फलें ह्यांच्या योगानें जिनेंद्र सिद्ध आणि मूरि ह्यांची पूजा करून, यक्ष यक्षी वगैरे देवतांना पूर्णाहुति द्यावी. नंतर आचार्यानें आपल्या हातांत तो कलश घेऊन, पुण्याहवाचनमंत्रांनी त्या गर्भिणीला अभिषेक करावा. नंतर शांतिभक्तीचा पाठ करून सर्व देवतांचें विसर्जन करावें. ततो गन्धोदकै रम्यैर्गर्भिणी स्वोदरं स्पृशेत् ॥ कलिकुण्डादि सद्यत्रं रक्षार्थ बन्धयेद्गले ॥ ६१ ॥ सौभाग्यवत्यः सन्नार्यश्वान्नादिना प्रतोषयेत् ॥ सुप्रमोदश्च सर्वेषां जातीनां समुत्पादयेत् ॥ ६२ ॥
ॐ कंठं व्हः पः असि आ उ सा गर्भीर्भकं प्रमोदेन परिरक्षत स्वाहा ॥ १ ॥ इति होमान्ते गन्धोदन प्रसिञ्च्य स्वपत्न्युदरं स्वयं स्पृशेद्धर्ता ॥ इति मोदः ॥
अर्थ -- नंतर गर्भिणीनें आपल्या उदाराला गंधोदक लावावें. आणि तिच्या गळ्यांत गर्भाच्या रक्षणाक रितां कलिकुंडादि यंत्र बांधावे. सुवासिनी स्त्रियांना त्या दिवशीं अन्नदान करून संतुष्ट करावें. आपल्या सर्व जीतिबांधवांनाही आनंदित करावें. “ ॐ कं टं " इत्यादि मंत्राने गर्भिणीच्या पतीनें स्त्रीच्या उदरावर
For Private And Personal Use Only