________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२९.
णाऱ्या श्रावकानें कधींही शयन करूं नये.
स्त्री समागमाचा काल.
ऋतुमत्यां तु भार्यायां तत्र सङ्गादिकं चरेत् ॥ अनृतुमत्यां भार्यायां न सङ्गमिति केचन ॥ २८ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ - भार्या ऋतुमती असतांना तिच्याशीं समागम करावा. आणि ऋतुमती नसतांना करूं नये असें कित्येक आचार्यांचें झणणें आहे. स्त्री रजस्वला झाल्यापासून सोळा दिवसपर्यंत तिला ऋतुमती असें ह्मणतात. त्यांत पहिले तीन दिवस टाकून राहिलेल्या तेरा दिवसांत ती ऋतुमती असल्यानें समागमाला योग्य आहे असें समजावें. आणि सोळा दिवसांच्या पुढे मात्र तिच्याशीं समागम करूं नये; असे तात्पर्य आहे.
गर्भाभूतं यत्कर्म कुर्याद्दिवैव हि ॥
रात्रौ कुर्याद्विधानेन गर्भबीजस्य रोपणम् ॥ २९ ॥
अर्थ -- गर्भाधान क्रियेच्या अंगभूत असलेलें कर्म दिवसां पूर्वी सांगितल्याप्रमाणें करावें. आणि मुख्य विधि पुढे सांगितल्याप्रमाणे रात्री करावा.
स्त्रीसमागमविधि.
For Private And Personal Use Only